T20I मध्ये जेसन होल्डरच्या दुहेरी हॅटट्रिकमागची कहाणी | The Story Behind Jason Holder's Double Hat-Trick in T20I

Jason Holder's Double Hat-Trick


जेसन होल्डरने इंग्लंडविरुद्ध पाचव्या T20I सामन्यात दुहेरी हॅट्ट्रिक घेऊन केवळ रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव कोरले नाही तर सामन्याच्या अत्यंत नाजूक वळणावर आपल्या संघाला विजय मिळवून दिला, ज्याच्या बळावर वेस्ट इंडिजने T20I मालिका 3-2 ने जिंकली.


जेसन होल्डर त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी ओळखला जात असला तरी, वेस्ट इंडिजमध्ये नुकत्याच झालेल्या T20I मालिकेत, विशेषतः चौथ्या आणि पाचव्या सामन्यात त्याच्या गोलंदाजीची खूप चर्चा झाली.


मात्र, होल्डरने आपल्या शेवटच्या सामन्यात मोईन अलीकडून 4 चेंडूत 4 षटकार खाल्ला होता, हे विसरता कामा नये. त्यामुळे होल्डरचे मनोबल पूर्णपणे खचले आणि वेस्ट इंडिजला पराभवाचा सामना करावा लागला.


होल्डरने पुढच्याच सामन्यात 4 चेंडूत 4 बळी घेऊन इंग्लंडचे कर्ज व्याजासह फेडले असे म्हणणे योग्य ठरेल. ते चार फलंदाज शेवटचे होते, त्यामुळे इंग्लंडचा संघ ऑलआऊट झाला, नाहीतर होल्डरकडे T20I मध्ये ५ चेंडूत ५ बळी घेण्याची सुवर्णसंधी होती.


दुहेरी हॅट्ट्रिक म्हणजे 4 चेंडूत 4 विकेट, तुम्हाला माहित नसेल की असा पराक्रम करणारा जेसन होल्डर जगातील पहिला गोलंदाज नाही. यापूर्वी हा विक्रम राशिद खान, लसिथ मलिंगा आणि कर्टिस केम्पफर यांच्या नावावर आहे. जेसन होल्डरनेही हे करत वेस्ट इंडिजसाठी इतिहास रचला आणि या यादीत सामील झाला.


4 चेंडूत 4 बळी घेतलेल्या T20I गोलंदाजांची यादी | List of T20I Bowlers with 4 Wickets in 4 Balls:

Bowler Team Opposition Ground Year
Rashid Khan Afghanistan Ireland Dehradun 2019
Lasith Malinga Sri Lanka New Zealand Kandy 2019
Curtis Campher Ireland Netherlands Abu Dhabi 2021
Jason Holder West Indies England Barbados 2022


पाचवा सामना 2-2 अशा बरोबरीत सुटल्यानंतर अंतिम सामन्यासारखाच होता. इंग्लंड संघाला शेवटच्या षटकात 180 धावा करण्यासाठी 20 धावांची गरज होती, सॅम बिलिंग आणि ख्रिस जॉर्डन क्रीजवर उपस्थित होते. होल्डरला त्याच्या पहिल्या दोन षटकात 25 धावा देत मोईन अलीची एकमेव विकेट मिळाली.


T20I मध्ये हॅटट्रिक घेणारा Jason Holder हा वेस्ट इंडिजचा पहिला गोलंदाज ठरला, शेवटच्या षटकात जॉर्डन (०७ ), बिलिंग (४१ ), आदिल राशिद (० ), आणी साकिब महमूदला  (० ) बाद करत त्याने कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली. 2.5-0-27-5


या संपूर्ण मालिकेत होल्डरच्या 15 विकेट्स 9.6 च्या सरासरीने, 7.78 च्या इकॉनॉमी रेटने आणि 7.4 च्या स्ट्राइक रेटने आल्या आहेत.


जेसन होल्डरची T20I मध्ये इंग्लंडविरुद्ध दुहेरी हॅटट्रिक:


31 जानेवारी रोजी, जेसन होल्डरने सोशल मीडियावर, विशेषतः ट्विटरवर वर्चस्व गाजवले. व्यावसायिक क्रिकेटपटू असो किंवा सामान्य माणूस, सर्वांनी होल्डरचे खूप कौतुक केले.


होल्डरच्या दुहेरी हॅटट्रिकनंतर काही मनोरंजक ट्विट पहा:

कॉपीराइट-मुक्त क्रिकेट तस्वीरों के लिए शीर्ष पांच पिक्साबे प्रोफाइल

इस लेख में, आपको शीर्ष पांच पिक्साबे प्रोफाइल मिलेंगे जो कॉपीराइट-मुक्त उच्च-गुणवत्ता वाली क्रिकेट-संबंधित तस्वीरें अपलोड करते हैं ताकि उनक...